Surprise Me!

प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणारे 11 माजी खासदार दोषी | Lokmat News

2021-09-13 6,732 Dailymotion

संसदेत प्रश्न विचारण्या साठी पैसे घेतल्याचा आरोप 11 खासदारांवर ठेवण्यात आला होता. 2005 सालच्या या घोटाळ्या बाबत या माजी खासदारांविरुद्ध दिल्लीच्या एका न्यायालयाने गुरुवारी भ्रष्टाचाराचे तसेच गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाचे आरोप निश्चित केले आहेत.<br />विशेष न्यायाधीश किरण बन्सल यांनी 11 माजी खासदारांसह एका व्यक्तीवर आरोप ठेवले असून या खटल्याची सुनावणी 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे. वाय. जी. महाजन, छत्रपालसिंह लोढा, अण्णासाहेब एम. के. पाटील, प्रदीप गांधी व सुरेश चंदेल (सर्व भाजप), रामसेवक सिंह (काँग्रेस), मनोज कुमार (राजद) आणि चंद्रप्रताप सिंह, लालचंद्र कोल व राजा रामपाल (सर्व बसप) हे माजी खासदार या प्रकरणातील आरोपी आहेत. राजा रामपाल यांचे तत्कालीन स्वीय सचिव रविंदर कुमार यांच्यावरही न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. विजय फोगट या आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावरील कार्यवाही रद्द करण्यात आली. फोगट हा दलाल असल्याचा आरोप होता.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon